ब्रेकिंग! सुपरस्टार अल्लू अर्जुनला 14 दिवसांचा तुरुंगवास
हैद्राबाद पोलिसांनी साऊथ सुपरस्टार अल्लू अर्जुनला अटक केल्याची माहिती समोर येत आहे. चित्रपट प्रदर्शनावेळी चेंगराचेंगरी प्रकरणात ही अटक करण्यात आल्याचे सांगितले जात आहे. हैदराबादच्या संध्या थिएटर प्रकरणी ‘पुष्पा 2’ अभिनेता अल्लू अर्जुनवर ही कारवाई करण्यात आली आहे.
चार डिसेंबर रोजी चित्रपटाच्या प्रदर्शनादरम्यान थिएटरमध्ये चेंगराचेंगरी झाली होती, ज्यामध्ये 35 वर्षीय महिलेचा मृत्यू झाला होता आणि अनेक जण जखमी झाले होते. या घटनेप्रकरणी पोलिसांनी अल्लू अर्जुन आणि थिएटर व्यवस्थापनावर गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर आता पोलिसाांकडून अल्लू अर्जुनला अटक करण्यात आली आहे. दरम्यान, अल्लू अर्जुनला 14 दिवसांसाठी तुरुंगात पाठवण्यात आले आहे. आज झालेल्या सुनावणीत न्यायालयाने त्याची रवानगी न्यायालयीन कोठडीत केली आहे.
पुष्पा 2 च्या स्पेशल स्क्रिनिंगदरम्यान चेंगराचेंगरी झाली होती, यामध्ये एका महिलेचा मृत्यू झाला होता. अल्लू अर्जुनला यापूर्वी याच प्रकरणात अटक करण्यात आली होती आणि आता त्याला 14 दिवसांसाठी तुरुंगात पाठवण्यात आले आहे.