हवामान

ब्रेकिंग! राज्यात थंडी वाढणार

  • गेल्या आठवड्यापासून राज्यात संमिश्र वातावरण पाहायला मिळाले. थंडी गायब होऊन कुठे पाऊस तर कुठे उष्णता वाढ असे चित्र होते. मुंबई, सोलापूर, पुण्यात तर तापमान वाढीमुळे नागरिक हैराण झाले होते. त्यामुळे आता नागरिकांसाठी पुन्हा आनंदाची बातमी आहे. थंडीने पुनरागमन केले आहे. काल राज्याच्या तापमानात चार अंशाची घट झाली. पुढील काही दिवस थंडीत आणखी वाढ होण्यार असल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे. तर काही ठिकाणी पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
  • पुणे वेधशाळेने दिलेल्या माहितीनुसार दक्षिण पूर्व पश्चिम बंगालच्या खाडीमध्ये कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे. त्यामुळे उद्यापासून १३ डिसेंबरपर्यंत दक्षिणेकडील राज्यात पुन्हा पाऊस होण्याची शक्यता आहे. त्यामुळे राज्यात थंडी वाढणार आहे. याचा परिणाम हवामानावर देखील झाला आहे. महाराष्ट्रात दिवसा ६ डिग्री तापमान वाढ झाली होती. मात्र, या तापमानात आता घट झाली आहे.

Related Articles

Back to top button