महाराष्ट्र

‘या’ महिलांचा लाडकी बहीण योजनेचा अर्ज बाद होणार म्हणजे होणारच

  • राज्य सरकारच्या लाडकी बहीण योजनेअंतर्गत अर्ज मंजूर झालेल्या महिलांना दीड हजार रुपयांची मासिक आर्थिक मदत दिली जाते. मात्र, काही लाभार्थींना अद्याप या योजनेचे पैसे मिळाले नसल्याचे दिसून आले आहे.
  • त्यामुळे अर्जदारांनी काही महत्त्वाच्या गोष्टी तपासून पाहणे गरजेचे आहे, कारण त्या पूर्ण झाल्यानंतरच लाभार्थ्यांच्या बँक खात्यात पैसे जमा होऊ शकतात. 
  • भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी एका मुलाखतीत सांगितले की, काही लाभार्थ्यांना योजनेचा लाभ का मिळणार नाही याचे कारण म्हणजे अर्ज करताना पात्रतेचे निकष न पूर्ण होणे. ज्या कुटुंबांचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा जास्त आहे, त्यांना योजनेचा लाभ मिळणार नाही. 
  • करदाते असलेल्या महिलाही योजनेसाठी पात्र राहणार नाहीत. त्यांनी पुढे आश्वासन दिले की, भविष्यात या योजनेतील मासिक मदतीत वाढ करून ती 1500 रुपयांवरून 2100 रुपये करण्यात येईल. लाडकी बहीण योजना शिंदे सरकारने राज्याच्या अंतरिम अर्थसंकल्पात जाहीर केली होती. 
  • महिलांच्या आर्थिक स्वावलंबनासाठी ही योजना उपयुक्त ठरली आहे. तरीही, लाभार्थ्यांनी अर्जात भरलेल्या माहितीत चूक असल्यास किंवा पात्रतेचे निकष पूर्ण होत नसल्यास त्यावर वेळीच दुरुस्ती करणे गरजेचे आहे.

Related Articles

Back to top button