ब्रेकिंग! मारकडवाडी प्रकरणातील मास्टरमाईंड कोण?
ईव्हीएम मशीनवर अविश्वास दाखवत सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस विधानसभा मतदारसंघात असलेल्या मारकडवाडी गावकऱ्यांनी बॅलेट पेपरवर मतदानाचा निर्णय घेतला होता. त्यानंतर आज याठिकाणी बॅलेट पेपरवर मतदान घेण्याची घोषणा करण्यात आली होती. मात्र, आता आमदार उत्तम जानकरांनी स्वतः हे मतदान रद्द करण्याची घोषणा केली आहे. दरम्यान, मारकडवाडीतून भाजप उमेदवार राम सातपुते यांना 843 तर उत्तम जानकरांना 1003 मते मिळाली.
गावकऱ्यांच्या दाव्यानुसार सातपुतेंना अपेक्षेपेक्षा जास्त मते मिळाली आहेत. सातपुतेंना फक्त 100 ते 150 मते अपेक्षित होती. तर जानकरांना दीड हजारपेक्षा जास्त मते अपेक्षित होती. हे सगळे ईव्हीएममध्ये घोळ करुन केल्याचा गावकऱ्यांना संशय आहे. त्यामुळेच बॅलेट पेपरवर पुन्हा निवडणूक घेण्याची मागणी गावकऱ्यांनी केली आणि आज त्याची प्रक्रिया पार पडणार होती.
सातपुते यांनी आमदार रणजितसिंह मोहिते -पाटील यांच्यावर मोठा आरोप केला आहे. मारकडवाडी गावातील बॅलेट पेपरवरील मतदान प्रक्रियेचा मास्टर माईंड हे आमदार रणजितसिंह मोहिते -पाटील आहेत. रणजितसिंह यांची लवकरच पक्षातून हकालपट्टी होईल आणि माळशिरस तालुक्यात लवकरच उत्तम जानकर यांचे जात वैधता प्रमाणपत्र रद्द होऊन पोटनिवडणूक लागेल, असा खळबळजनक गौप्यस्फोट केला आहे.