सोलापूर

ब्रेकिंग! ठाकरे गटाच्या प्रवक्त्यांची फौज तयार

ठाकरे गटाने आज अधिकृत प्रवक्त्यांची नवी यादी जाहीर केली आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार ही यादी जाहीर करण्यात आली असून खासदार संजय राऊत आणि अरविंद सावंत यांची मुख्य प्रवक्ते म्हणून निवड करण्यात आली आहे.

यासोबतच सहा नव्या प्रवक्त्यांचीही नियुक्ती करण्यात आली आहे. पक्षाच्या भूमिकेचे प्रसारण प्रसारमाध्यमांमधून योग्य प्रकारे व्हावे, यासाठी ही जबाबदारी देण्यात आली आहे. शिवसेना मध्यवर्ती कार्यालयाने पत्रकाद्वारे याबाबतची माहिती प्रसिद्ध केली.

प्रवक्तेपदाची जबाबदारी मिळवणाऱ्यांमध्ये सुषमा अंधारे यांचे नाव विशेष लक्ष वेधून घेत आहे. ठाकरेंसाठी ठाम भूमिका घेणाऱ्या आणि कायमच आक्रमक पवित्रा घेत आलेल्या अंधारेंना ही जबाबदारी मिळाल्याने त्यांचे पक्षातील स्थान आणखी मजबूत झाले आहे.

मुख्य प्रवक्ते: खासदार संजय राऊत, खासदार अरविंद सावंत.

प्रवक्ते: अ‍ॅड. अनिल परब, प्रियंका चतुर्वेदी (उपनेत्या), अ‍ॅड. हर्षल प्रधान (जनसंपर्कप्रमुख), सुषमा अंधारे (उपनेत्या), आनंद दुबे, जयश्री शेळके.

ठाकरे गटाच्या या नव्या प्रवक्त्यांमुळे आगामी निवडणुकांमध्ये पक्षाची भूमिका अधिक प्रभावीपणे मांडली जाईल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.

Related Articles

Back to top button