महाराष्ट्र
रायगडावर पहिली ते सातवीपर्यंतच्या विद्यार्थ्यानी भेट दिलीच पाहिजे

- किल्ले रायगड येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३४५ व्या पुण्यतिथीनिमित्त त्यांना केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मानवंदना दिली. यावेळी त्यांनी राजमाता जिजाऊ यांना सर्वप्रथम वंदन केले. यावेळी मंचावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, भाजप खासदार उदयनराजे भोसले, केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ, मंत्री भरत गोगावले, मंत्री अदिती तटकरे यांच्यासह अनेक मंत्री उपस्थित होते.
- यावेळी शहांनी छत्रपती शिवाजी महाराजांचे मी चरित्र वाचले असल्याचे सांगत म्हटले की, अटक ते कटकपर्यंत राज्य स्थापन करणारे छत्रपती शिवाजी महाराज होते. त्यांच्याकडे ना सैन्य होते, ना संपत्ती होती मात्र दुर्दम्य साहस त्यांच्याकडे होते. त्याच्या जोरावर त्यांनी उत्तर प्रशासन असलेले हिंदवी स्वराज्य स्थापन केले. त्यामुळे आज आपला धर्म, संस्कृती वाचली आहे. त्यांनी स्वतःला आलमगिर म्हणवणाऱ्यांची इथेच कबर खोदली, असेही शहा म्हणाले.
- रायगडावर पहिली ते सातवीपर्यंतच्या विद्यार्थ्यानी भेट दिलीच पाहिजे, त्या विद्यार्थ्यांनी इथे आलेच पाहिजे, अशी व्यवस्था येथे निर्माण केली पाहिजे. रायगड हे पर्यटनस्थळ नाही तर प्रेरणास्थळ झाले पाहिजे, असेही शहा म्हणाले.
- गुलामीची मानसिकता तोडण्याचे काम शिवाजी महाराजांनी केले. देशाच्या स्वातंत्र्याला जेव्हा १०० वर्षे पूर्ण होतील तेव्हा आपण स्वयंपूर्ण झालेलो असू, असा विश्वासही शहांनी व्यक्त केला.शिवाजी महाराजांचे अष्टप्रधान मंडळ हे आजचे आमची कॅबिनेट आहे. असा गौरोवोल्लेख त्यांनी केला. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शिवाजी महाराजांची मुद्रा भारत सरकारच्या नौदलावर गोंदले आहे, असेही शहा म्हणाले.



