राजकीय

ब्रेकिंग! काँग्रेसची धुसफूस आली हमरीतुमरीवर

  • विधानसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीला धक्का देत महायुती राज्यात दुसऱ्यांदा सरकार स्थापन करणार आहे. सरकारचा पाच डिसेंबर रोजी शपथविधी होणार आहे. तर दुसरीकडे विधानसभा निवडणुकीमध्ये झालेल्या दारुण पराभवामुळे काँग्रेस ॲक्शन मोडमध्ये आली आहे. विधानसभा निवडणुकीमध्ये पक्षविरोधी कारवाया करणाऱ्या नेत्यांवर काँग्रेस कारवाई करणार आहे.
  • दरम्यान नागपूरचे काँग्रेस उमेदवार बंटी शेळके यांनी गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या आणि राज्यात झालेल्या काँग्रेस पक्षाच्या पराभवाचे खापर प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यावर फोडणे सुरू केले आहे. पटोले हे आरएसएसचे एजंट असून त्यांनी जाणून बुजून राज्यात काँग्रेसला पराभूत होऊ दिले, असा शेळके यांचा आरोप आहे. काल शेळके यांनी काँग्रेस कार्यालयात घुसून बैठक घेण्याचे प्रयत्न केले होते. मात्र काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी कार्यालयाला कुलूप लावल्यामुळे शेळके यांना फूटपाथवरच बैठक घ्यावी लागली होती. त्यावेळी शेळके यांनी पटोले यांच्यावर गंभीर आरोप केले होते. त्यानंतर काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषद घेत शेळके यांना गप्प राहण्याचा इशारा दिला आहे.
  • तसेच तुम्हाला जी तक्रार करायची आहे, ती पक्षाच्या अंतर्गत बैठकीत करा. मीडियामध्ये जाऊन प्रदेशाध्यक्ष आणि शहराध्यक्ष यांच्या विरोधात बोलले तर आम्ही पण गप्प बसणार नाही. पटोले विरोधात बोललेले आम्ही अजिबात खपवून घेणार नाही, असा इशारा काँग्रेस पदाधिकाऱ्यांकडून देण्यात आला आहे.

Related Articles

Back to top button