सोलापूर

ब्रेकिंग! सोलापूरच्या मारकडवाडीत हायव्हॉल्टेज ड्रामा

ईव्हीएम मशीनवर अविश्वास दाखवत सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस विधानसभा मतदारसंघात असलेल्या मारकडवाडी गावकऱ्यांनी बॅलेट पेपरवर मतदानाचा निर्णय घेतला होता. त्यानंतर आज याठिकाणी बॅलेट पेपरवर मतदार घेण्याची घोषणा करण्यात आली होती. मात्र, आता आमदार उत्तम जानकरांनी स्वतः हे मतदान रद्द करण्याची घोषणा केली आहे.

मारकडवाडीत बॅलेट पेपरवरील मतदान घेण्याची घोषणा करण्यात आल्यानंतर याठिकाणी जमावबंदीचे आदेश लागू करण्यात आले होते. जमावबंदीच्या आदेश असल्याने आणि प्रशासनाचा दबाव असल्याने आम्ही वेगळ्या मार्गाने न्याय मिळवू, असे जानकरांनी म्हटले आहे. तसेच शालेय मुलांचे आणि इतर कोणाचाही नुकसान होऊ नये, गावाची कायदा सुव्यवस्था बिघडू नये, यासाठी मतदान प्रक्रिया रद्द करण्याचा घेतला निर्णय घेतल्याचे जानकरांनी सांगितले आहे.

एकीकडे जानकर यांनी बॅलेट पेपरवरील मतदान रद्द करण्याची घोषणा केली असली तरी घडलेल्या प्रकाराबाबत आपण येत्या पंधरा दिवसात ईव्हीएम बाबतचे सर्व पुरावे महाराष्ट्रला देणार असल्याचे जानकरांनी म्हटले आहे. त्यामुळे आता जानकर नेमके कोणते पुरावे महाराष्ट्रातील जनतेसमोर आणणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Related Articles

Back to top button