राजकीय भूकंपाचे संकेत, एकनाथ शिंदे विरोधी पक्षनेते?
महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण आणि शिंदेंच्या शिवसेनेची सरकारमध्ये भूमिका काय असणार,याबद्दल चर्चांना उधाण आले आहे. दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पवार गटाने शांतपणे सरकारमध्ये त्यांच्या पक्षाची भूमिका आणि त्यांना कोणती मंत्रीपदे मिळायला पाहिजे याची चर्चा सुरु केली आहे. त्यासोबतच भाजपच्या दिल्लीतील नेत्यांसोबतही भेटीगाठी सुरु आहेत. दरम्यान, आता सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांच्या एका पोस्टने खळबळ उडाली आहे.
दमानियांनी पोस्टमध्ये काय म्हटले आहे? – एकनाथ शिंदे विरोधी पक्ष नेते? परवाच संध्याकाळी आमच्या काही कार्यकर्त्यांना मी एक पत्रकार भाऊंशी झालेला संवाद संगात होते. चार दिवसांपूर्वी PC घेऊन भाजपाला समर्थन देणारे शिंदे अचानक गावी गेले, मग ताप काय आला, मग घरी काय आले. दाल मे कुछ काला है. माध्यम प्रतिनिधींचा हवाला देत ही भाजपाचीच रणनीती असून यामध्ये विरोधी पक्षच संपवण्याचा भाजपाचा कट असल्याचा गंभीर आरोप दमानिया यांनी केला. (भाजपाला) त्यांना हवे नको ते सगळे पुरवले जाईल आणि विरोधी पक्ष नेता पण यांचाच, या शब्दात त्यांनी सूचक वक्तव्य केले आहे.
पोस्टमध्ये लिहिलेल्या वरील ओळी पाहता येत्या काही दिवसात महायुतीत नेमक्या कोणत्या राजकीय घाडमोडी घडणार आणि खरंच राज्यात राजकीय भूकंप येणार का? हा प्रश्न उपस्थित होत आहे.