राजकीय

काँग्रेसला तगडा झटका

महाराष्ट्र राज्याच्या विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचा दारुण पराभव करत महायुतीने पुन्हा एकदा सत्तेवर दावा केला. दरम्यान, दिल्ली विधानसभेच्या निवडणुका जवळ आल्या आहेत. सत्ताधारी आम आदमी पार्टीने या निवडणुकीची जोरदार तयारी सुरू केली आहे. यातच आता आम आदमी पक्षाचे संयोजक अरविंद केजरीवाल यांनी इंडिया आघाडी आणि काँग्रेसला तगडा झटका दिला आहे. आगामी दिल्ली विधानसभा निवडणुकीत आम आदमी पार्टी कोणत्याच पक्षाशी आघाडी करणार नाही. या निवडणुका आप स्वबळावर लढणार आहे. केजरीवाल यांच्या या घोषणेने इंडिया आघाडीला झटका बसला आहे.

दिल्ली विधानसभेतील 70 पैकी 62 आमदार आम आदमी पक्षाचे आहेत. केजरीवाल यांनी एका पत्रकार परिषदेत आगामी निवडणुकीबाबत मोठी घोषणा केली.

या पत्रकार परिषदेत त्यांना निवडणुकीतील आघाडीबाबत विचारले असता केजरीवाल म्हणाले, आमचा पक्ष कोणतीही आघाडी करणार नाही. केजरीवाल यांच्या घोषणेआधी काँग्रेसनेही दिल्ली विधानसभा निवडणूक स्वबळावर लढण्याची घोषणा केली होती. यानंतर केजरीवाल यांनीही स्वबळाचा नारा दिल्याने विरोधकांच्या इंडिया आघाडीला तडे जात असल्याचे स्पष्ट होऊ लागले आहे.

Related Articles

Back to top button