क्राईम

चेष्टा मस्करीत खास मित्रानेच केला मित्राचा खून

मित्र म्हटले की गंमत जंमत आलीच. एकमेकांची चेष्टा मस्करी केली जाते. मात्र, हीच मस्करी एकाच्या जिवावर बेतली आहे. एका मेडिकलमध्ये दोघे जण एकमेकांची गमंत करत उभे होते. या दरम्यान, चेष्टा सहन न झाल्याने मित्राने दुसऱ्या मित्रावर कात्रीने हल्ला केला. या हल्ल्यात मित्र गंभीर जखमी झाला असून त्याचा जागीच मृत्यू झाला. ही घटना अहमदनगर शहरातील मुकुंदनगर परिसरात घडली.

जीशान खान असे खून झालेल्या मित्राचे नाव आहे. तर शमसुद्दीन खान असे चेष्टा सहन न झाल्याने जीशानची हत्या करणाऱ्या आरोपीचे मित्राचे नाव आहे. ही घटना शुक्रवारी रात्री घडली. जखमी जिशान याला शहरातील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, शनिवारी सकाळी त्याचा उपचार सुरू असताना मृत्यू झाला.

शमसुद्दीन हे दोघे एका मेडिकलमध्ये उभे होते. हे दोघेही चांगले मित्र असून त्यांची दुकानात असताना चेष्टा मस्करी सुरू होती. यावेळी जीशानने केलेली चेष्टा मस्करी शमसुद्दीनला सहन झाली नाही. त्याने दुकानात असलेली कात्री घेऊन थेट जीशानवर हल्ला केला. यात जीशान हा गंभीर जखमी झाला. त्याला तातडीने दवाखान्यात भरती करण्यात आले. मात्र, उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला. या घटनेप्रकरणी गुन्हा दखल करण्यात आला असून आरोपी शमसुद्दीन हा फरार झाला आहे. पोलिस त्याचा शोध घेत आहेत. 

Related Articles

Back to top button