महाराष्ट्र
ब्रेकिंग! एकनाथ शिंदे म्हणाले, मी माझा निर्णय घेतलाय, आता…

- भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांसोबत दुसरी बैठक पार पडणार असून या बैठकीत गृहमंत्रिपदाबाबत होणाऱ्या चर्चेतून प्रश्न सुटणार असल्याचे काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज पत्रकार परिषदेत सांगितले. दरम्यान, साताऱ्यातील दरे गावात शिंदे यांची पत्रकार परिषद पार पडली. यावेळी शिंदे यांनी विविध मुद्द्यांवर स्पष्टपणे आपली भूमिका मांडत अनेक प्रश्नांची उत्तरे दिली आहे.
- शिंदे पुढे म्हणाले, ठाण्याच्या पत्रकार परिषदेतच मी माझी भूमिका स्पष्टपणे मांडली असून पंतप्रधान मोदी आणि केंद्रीय मंत्री अमित शहा जो निर्णय घेतील, तो आम्हाला मान्य असल्याचे मी आधीच सांगितले आहे. मी माझा निर्णय घेतला आहे. माझ्या या भूमिकेत कुठलाही किंतू परंतू नाही. अमित शहा यांच्यासोबत आमची एक बैठक पार पडली असून दुसरी एक बैठक पार पडणार आहे. या बैठकीत गृहमंत्रिपदाबाबत चर्चेतून प्रश्न सुटणार असल्याचे शिंदे यांनी स्पष्ट केले.
- तसेच मी जे काम केले. त्यामुळे मी जनतेचा मुख्यमंत्री आहे. मी सर्वसामान्य माणूस म्हणून जनतेचे काम केले. कॉमन मॅनच्या अडचणी समजून घेऊन मी काम केले आहे, असे शिंदे यांनी सांगितले.