क्राईम

सुहागरात्रीच्या दिवशीच वधूने दिले असे सरप्राईज

  1. राजा रघुवंशी या तरुणाची पत्नीकडून हनिमूनला गेल्यानंतर हत्या झाल्याचे प्रकरण ताज असतानाच आता एक धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. सुहागरात्रीच्या दिवशीच नवरीने आपल्या पतीला असे सरप्राईज दिले ज्यामुळे वराचे अख्ख कुटुंब हादरले आहे. त्यामुळे या कुटुंबाला मोठा धक्का बसला आहे.
  2. ही घटना उत्तर प्रदेशमधील बांकपूर गावमध्ये घडली आहे. बांकापूर गावचा रहिवासी असलेला रामगोपाल नावाच्या तरुणाचे लग्न अनेक वर्षांपासून होत नव्हते. आपल्या मुलाचे लग्न होत नाही म्हणून रामगोपालचे कुटुंब चिंतेत होते. याचदरम्यान त्याच गावातील गोकुळ वर्मा नावाच्या व्यक्तीने रामगोपालच्या कुटुंबाला एका तरुणीचा फोटो दाखवला. रामगोपालच्या कुटुंबाला ही मुलगी आवडल्याने ते देखील लग्नासाठी तयार झाले.
  3. मात्र या घटनेत त्यानंतर धक्कादायक ट्विस्ट आले जेव्हा या तरुणीच्या वडिलांनी लग्नासाठी रामगोपालच्या कुटुंबाकडे दोन लाख रुपयांची मागणी केली. मुलाचे लग्नच जमत नसल्यामुळे त्याच्या वडिलांनी देखील आपले सर्व दागिने विकून दोन लाख रुपये जमा केले. त्यानंतर लग्न जमले. एका मंदिरामध्ये त्या दोघांचे लग्न लावण्यात आले. लग्नाचा विधी पूर्ण होताच मुलाच्या वडिलांनी मुलीच्या वडिलांना दोन लाख रुपये दिले.
  4. मात्र लग्न झाल्यानंतर जेव्हा वधूला तिच्या सासरी पाठवण्याची वेळ आली तेव्हा गोकुळ वर्मा आणि या मुलीच्या वडिलांनी म्हटले की, तिला बाथरूमला जायचे आहे. त्यानंतर सर्व जण आपल्या कामाला लागले. संधी मिळताच गोकुळ आणि या मुलीचे वडील तिला घेऊन घटनास्थळावरून फरार झाले. बराचवेळ शोध घेऊन देखील ते तिघे न सापडल्यामुळे अखेर त्यांनी त्यांच्याविरोधात तक्रार दाखल केली. या घटनेबाबत अधिक तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.

Related Articles

Back to top button