राजकीय

सूरतमध्ये ठाकरेंशी बोलताना शिंदेंना रडू कोसळले, म्हणाले आता माघारी फिरल्यास…

  • राज्यात विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी सुरु असून राजकीय पक्षातील नेत्यांकडून प्रचार सभांचा धडाका सुरू आहे. एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. राज्यातील अनेक मतदारसंघात शिवसेना विरुद्ध शिवसेना असा सामना रंगला आहे. त्यातच आता आदित्य ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांच्याबाबत मोठा गौप्यस्फोट करत खळबळ उडवून दिली आहे. 
  • आदित्य यांनी एका हिंदी न्यूज वेबसाईटला दिलेल्या मुलाखतीत शिवसेनेतील बंडखोरीबाबत मोठा गौप्यस्फोट केला आहे. या मुलाखतीत आदित्य ठाकरेंनी अनेक खुलासे केले आहेत. तत्कालीन राजकीय परिस्थिती आणि शिवसेना फुटीवर मत मांडले आहे.
  • २२ जून २०२२ रोजी एकनाथ शिंदे यांनी ४० आमदारांना सोबत घेऊन शिवसेनेमध्ये बंड घडवून आणले आणि महाराष्ट्रात सत्तांतर होऊन महायुतीचे सरकार स्थापन झालं. या सत्तास्थापनेसाठी एकनाथ शिंदे व ४० आमदारांनी सूरत, गुवाहाटी ते गोवा असा प्रवास केला होता. या बंडाबाबत आदित्य यांनी शिंदे यांच्याबाबत मोठा गौप्यस्फोट केला आहे.
  • आदित्य म्हणाले की, १९ जून रोजी शिवसेनेचा स्थापना दिवस असतो आणि २० जून २०२२ रोजी विधान परिषद आमदारांसाठी मतदान होते. विधान परिषदेच्या दोन्ही आमदारांसाठी आम्ही शेवटच्या वेळी कोटा बदलला आणि आमचे आमदार जिंकले. पण मतमोजणी सुरू असतानाच ते पळून गेले. पहिल्यांदा आम्हाला वाटले यांच्यासोबत १२ लोक आहेत. दिवस जास्तीत जास्त पुढे गेले तसे अनेक मंत्री त्यांच्यासोबत होते.
  • शिंदेंनी सूरतमधून उद्धव ठाकरेंना कॉल केला होता. त्यावेळी फोनवर ते रडले होते. आता मागे फिरलो तर लोक मला संपवतील. ते उद्धव ठाकरेंसमोर अनेकदा रडले आहेत. मुख्यमंत्री आजारी होते. त्यांना उद्धव ठाकरेंची चिंता नव्हती. जेलमध्ये जायचे नाही तर हे सरकार आपण पाडू, असा विचार शिंदेंचा होता, तसेच पक्षप्रमुख आजारी आहेत, आपले भवितव्य काय, असा विचारही ते करत होते, असा गौप्यस्फोट आदित्य ठाकरेंनी केला.

Related Articles

Back to top button