ब्रेकिंग! भाजपमध्ये होणार सर्जिकल स्ट्राईक?
सध्या संपूर्ण राज्यात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. सर्वच राजकीय पक्षाकडून केल्या जात झालेल्या प्रचारामुळे निवडणुकीतील रंगत आणखी वाढली आहे. आज सुपर संडेचा मुहूर्त साधून मोठ्या नेत्यांच्या जाहीर सभा होणार आहेत. दरम्यान, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या एका वक्तव्याने खळबळ उडाली आहे. त्यांनी सध्याचे राजकारण, भाजपामधील वाढते इनकमिंग आणि विधानसभा निवडणुकीवर स्पष्ट मते मांडली. गडकरी हे स्पष्ट वक्ते म्हणून ओळखल्या जातात.
बेधडक वक्तव्यामुळे पण जनता त्यांच्यावर प्रेम करते. भाजपमध्ये सध्या राजकीय जोमात आहे. अनेक जण पक्षात येत आहेत. पक्षात गोतावळा वाढत आहे, असे त्यांनी सांगितले. पण त्याचवेळी त्यांनी एक महत्त्वाचे विधान केले आहे. त्यांनी पक्षातंर्गत सर्जिकल स्ट्राईक करण्याचा बॉम्ब टाकला आहे.
आपल्या देशात मतभेद ही काही समस्या नाही. पण विचारांचा, धोरणांचा अभाव ही मोठी समस्या आहे. सोयीच्या राजकारणाचे धोरण महत्त्वपूर्ण नाही, तर विचारधारेशी सुसंगत राजनीती महत्त्वाची असल्याचे गडकरी म्हणाले. भाजपमध्ये इतर पक्षाचे नेते आणि कार्यकर्ते विविध कारणांमुळे दाखल होत आहेत. जस जसे पीक जोमात येते. तस तसा रोगाचा प्रादुर्भाव वाढतो. चांगल्या धान्याला कीड लागते.
पीक वाचावे यासाठी मग रोगावर कीटकनाशक मारावे लागते, असा इशारा त्यांनी दिला. गडकरी यांच्या वक्तव्याने आयाराम-गयाराम नेत्यांचे धाबे दणाणले आहे. इतर पक्षात अनेक वर्षे सत्तेच्या लादीवर बसलेली काही नेते भाजपमध्ये सुगीचे दिवस शोधत आहेत. ज्यांना भाजपाच्या विचारधारेशी घेणे-देणे नाही, सत्तेशी ज्यांची जवळीकता आहे. त्यांच्यावर आता सर्जिकल स्ट्राईक होणार का? यावर आता चर्चा सुरू झाली आहे.