राजकीय

‘लाव रे तो व्हिडिओ…’ म्हणत प्रणिती शिंदे आक्रमक

  • लाडकी बहीण योजनेचे दीड हजार रुपये घेऊन काँग्रेस रॅलीत दिसणाऱ्या महिलांचे फोटो काढून घ्या, त्यांचे नावे लिहून घ्या आणि ते फोटो आमच्याकडे द्या, त्यांची व्यवस्था करतो, असे वादग्रस्त वक्तव्य भाजपचे खासदार धनंजय महाडिक यांनी केले. ते काल एका जाहीर सभेत बोलत होते. त्यामुळे आता राज्याचे राजकारण चांगलेच तापले आहे.
  • दरम्यान महाडिक या वक्तव्यानंतर आता त्यांनी माफी मागितली आहे. माझे हे वक्तव्य कुठल्याही माता भगिनीचा अपमान करण्यासाठी नव्हते, असे स्पष्टीकरण महाडिक यांनी दिले आहे. महाडिक यांच्या वक्तव्यानंतर विरोधकांकडून जोरदार टीका होत आहे.
  • सोलापूरच्या खासदार प्रणिती शिंदे म्हणाल्या की, महाराष्ट्र हे पुरोगामी राज्य आहे . येथे महिलांचा सन्मान केला जातो. परंतु महाडिक यांनी महिलांचा अवमान केला आहे. त्यांनी राज्यातील महिलांची माफी मागायला हवी. दरम्यान, लाव रे तो व्हिडिओ म्हणत खासदार प्रणिती शिंदे यांनी कोल्हापुरात येऊन महाडिक यांचे ते भाषण दाखवले आहे.

Related Articles

Back to top button