राजकीय
ब्रेकिंग! भाजपचा जाहीरनामा प्रसिद्ध
- सध्या संपूर्ण राज्यात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. सर्वच राजकीय पक्षाकडून केल्या जात झालेल्या प्रचारामुळे निवडणुकीतील रंगत आणखी वाढली आहे. आज सुपर संडेचा मुहूर्त साधून मोठ्या नेत्यांच्या जाहीर सभा होणार आहेत. दरम्यान, आज भाजपने वचननामा प्रसिद्ध करण्यात आला. यावेळी जाहीरनामा समितीचे प्रमुख सुधीर मुनगंटीवार उपस्थित होते. तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत त्यांनी ‘महाराष्ट्र संकल्पपत्र 2024’ हे जाहीर केले. भाजपच्यावतीने राज्यासाठी आज संकल्पपत्र प्रस्तुत करण्यात आला. हा संकल्प राज्याच्या प्रगतीचा आणि विकासाचा असल्याचे मुनगंटीवार म्हणाले. शहा यांच्या हस्ते या संकल्पपत्राचे विमोचन करण्यात आले.
- यावेळी फडणवीस यांनी सांगितले की, आजच्या संकल्पपत्रामध्ये अनेक गोष्टी आहेत. यात 25 गोष्टी आम्ही हायलाईट केल्या आहेत. त्यातील दहा मुद्द्यांत आम्ही महायुतीचा दहा कलमी कार्यक्रम घोषित केला. आम्ही लाडक्या बहिणींना दीड हजार रुपयांऐवजी 2100 रुपये देणार आहोत. आम्ही शेतकऱ्यांची कर्जमाफी करणार आहोत. भावांतर योजना आणून जिथे हमी भावाने खरेदी होणार नाही, तिथे भावांतर योजनेतून शेतकऱ्यांना फायदा देऊ.
- प्रत्येक गरीबांना अन्न आणि निवाऱ्याचा हक्क देण्याचा निर्णय घेतला आहे. वृद्ध पेन्शन योजना ही दीड हजार रुपयांवरून 2100 रुपये करणार आहोत. जीवनावश्यक वस्तूंचे भाव स्थिर करण्यासाठी मार्केट इंटरवेन्शन करणार आहोत. महाराष्ट्रामध्ये 25 लाख रोजगारांची निर्मिती करणार आहोत. त्यासोबत दहा लाख विद्यार्थ्यांना विद्यावेतनाच्या माध्यमातून लाभ देऊ. सरकार स्थापनेच्या 100 दिवसांमध्ये व्हिजन डॉक्यूमेंट तयार करू. मेक इन महाराष्ट्राचे धोरण प्रभावीपणे राबवू, असे फडणवीस यांनी सांगितले.