राजकीय

ब्रेकिंग! पाचशे रुपयांत सहा घरगुती गॅस सिलेंडर

सध्या संपूर्ण राज्यात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. सर्वच राजकीय पक्षाकडून केल्या जात झालेल्या प्रचारामुळे निवडणुकीतील रंगत आणखी वाढली आहे. आज सुपर संडेचा मुहूर्त साधून मोठ्या नेत्यांच्या जाहीर सभा होणार आहेत. दरम्यान, विधानसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीचा जाहीरनामा काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी आज प्रसिद्ध केला. महालक्ष्मी योजनेंतर्गत महिलांना दरमहा तीन हजार रुपये दिले जाणार असून प्रत्येक मुलीला एक लाख रुपये दिले जाणार आहेत.

यासह महाविकास आघाडीने घोषणांचा पाऊसच पाडला असून अनेक योजना सत्तेत आल्यास सुरु करण्यात येईल, असे जाहीरनाम्यात म्हटले आहे. महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे सरकार आल्यास महिला कर्मचाऱ्यांना मासिक पाळीच्या दोन दिवस ऐच्छिक रजा देणार, अशी घोषणा जाहीरनाम्यात करण्यात आली आहे.

महाविकास आघाडी पहिल्या शंभर दिवसांत हे करणार?- महालक्ष्मी योजनेंतर्गत महिलांना दरमहा तीन हजार रुपये देणार, महिलांचा बस प्रवास मोफत करणार, सहा घरगुती गॅस सिलेंडर पाचशे रुपयांत देणार, महिला कर्मचाऱ्यांना मासिक पाळीच्या दोन दिवस ऐच्छिक रजा देणार, जन्मास आलेल्या प्रत्येक मुलीस 18 वर्षे पूर्ण केल्यानंतर एक लाख रुपये देणार.

Related Articles

Back to top button