क्राईम
ब्रेकिंग! सीमावाद चिघळला! महाराष्ट्राच्या वाहनांवर तुफान दगडफेक

कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद हा न्यायप्रविष्ट असल्याचे सांगितले होते. मात्र आज कन्नड रक्षण वेदिकेच्या कार्यकर्त्यांनी महाराष्ट्राच्या वाहनांवर हल्ला केला. आज दुपारच्या सुमारास वेदिकेच्या कार्यकर्त्यांनी बेळगावमधील हिरबागेवाडी टोलनाक्यावर महाराष्ट्राच्या वाहनांवर हल्ला केला.
बेळगावात महाराष्ट्राच्या 5 वाहनावर हल्ला करण्यात आल्याची माहिती मिळते. महाराष्ट्राच्या वाहनांच्या गाडीच्या काचांसह नंबर प्लेट आणि काही वाहनांचे पार्ट्स तोडण्यात आले आहे. शिवाय, वेदिकेचे कार्यकर्ते आक्रमक झाले असून त्यांनी महाराष्ट्राच्या वाहनांसमोर आंदोलन सुरू केले आहे. पुण्याहून बंगळुरुकडे जाणाऱ्या या वाहनांवर हल्ला करण्यात आला आहे. कन्नड रक्षण वेदिका संघटनेच्या कार्यकर्त्यांनी गाड्यावर चढून घोषणाबाजी केली