खुशखबर! टीव्हीएस ज्युपिटर ईव्ही होणार लाँच

Admin
1 Min Read
  • सोलापूरसह अन्य भागात टीव्हीएस ज्युपिटर बाईकला मागणी वाढत आहे. दरम्यान काही दिवसांपूर्वी टीव्हीएसने आपल्या लोकप्रिय ज्युपिटर बाईकचे इलेक्ट्रिक व्हेरिएंट 2025 ऑटोमोबिलिटी इव्हेंटमध्ये सादर केले होते. आता ती लवकरच अधिकृतपणे लाँच होणार आहे.
  • या इलेक्ट्रिक बाईकमध्ये 2.44kWh क्षमतेची लिथियम आयन बॅटरी देण्यात आली आहे. एकदा पूर्ण चार्ज केल्यावर ही बाईक तब्बल दोनशे किमीची रेंज देते. त्याचबरोबर यामध्ये 4 किलोवॅट पीक पॉवर निर्माण करणारी BLDC मोटर दिली आहे, जी या बाईकला 85 किमी/तास टॉप स्पीड मिळवून देते.
  • ही स्कूटर फास्ट चार्जिंग सपोर्टसह येते. फक्त 30 मिनिटांत 0 ते 80 टक्क्यांपर्यंत चार्ज करता येते.
  • या बाईकची किंमत 85 हजार ते 95, हजार (एक्स-शोरूम) दरम्यान असणार आहे. 2025 च्या अखेरीस ही स्कूटर बाजारात येण्याची शक्यता आहे. सुरुवातीला तुम्ही फक्त 15 हजार भरून ही स्कूटर बुक करू शकता आणि उर्वरित रक्कम फायनान्स करून मासिक हप्त्यांमध्ये फेडू शकता.
  • ही बाईक इलेक्ट्रिक वाहन बाजारात मोठी गेमचेंजर ठरू शकते.
Share This Article