- गेल्या काही दिवसांपासून इराण आणि इस्त्रायलमध्ये मोठ्या प्रमाणात तणाव निर्माण झाल्याने दोन्ही देश एकमेकांवर मिसाईल हल्ले करत आहे. इस्त्रायलकडून काल पुन्हा एकदा इराणवर जोरदार हवाई हल्ला करण्यात आला आहे. यावेळी इस्त्रायलकडून इराणच्या सरकारी मीडिया चॅनेल आयआरआयबीला टार्गेट करण्यात आले. या चॅनेलवर लाईव्ह बुलेटिन सुरु असताना इस्त्रायलकडून हल्ला करण्यात आला. हल्ला होताच बुलेटिन वाचणारी अँकरने तिकडून पळ काढला. अँकरने धाव घेत सुरक्षित ठिकाणी आश्रय घेतला. सध्या या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडिया व्हायरल झाला आहे. तर दुसरीकडे तेहरानमध्ये असणाऱ्या सर्व रेडिओ स्टेशनला आणि टीव्ही चॅनेलला टार्गेट करणार असल्याची धमकी इस्त्रायलकडून देण्यात आली आहे.
- दोन्ही देशांकडून गेल्या चार दिवसांपासून एकमेकांवर हल्ले सुरु आहेत. इस्त्रायलकडून इराणची राजधानी तेहरानला टार्गेट करण्यात येत आहे तर इराणकडून इस्त्रायलची राजधानी तेल अवीव आणि हैफा शहराला टार्गेट करण्यात येत आहे. इराणकडून करण्यात आलेल्या हल्ल्याला इस्त्रायली एअर डिफेन्स सिस्टिम रोखण्यास अयशस्वी झाल्याने इस्त्रायला मोठे नुकसान सहन करावे लागले आहे.
- आता इस्त्रायलकडून इराणच्या सरकारी मीडिया चॅनेलला टार्गेट करण्यात आले आहे. तर दुसरीकडे या हल्ल्यापूर्वी इस्त्रायलकडून इराणच्या सरकारी मीडियाचा परिसर रिकामा करण्याचा इशारा देण्यात आला होता, असा दावा टाईम्स ऑफ इस्त्रायलकडून करण्यात आला आहे.
बातम्या सांगत असतानाच पडला बॉम्ब, अँकर पळाली…
