- इस्रायली सैन्याने आज पुन्हा एकदा इराणवर शक्तिशाली कारवाई केली आहे. या कारवाईत इराणचे सर्वोच्च लष्करी अधिकारी अली शादमानी हे ठार झाले असल्याचे सांगण्यात येत आहे. मागच्या पाच दिवसामध्ये इस्रायलने इराणच्या दुसऱ्या सर्वोच्च लष्करी अधिकाऱ्याला ठार केले आहे.
- शादमानी हे इराणी सैन्याचे आपत्कालीन कमांडर होते. अलिकडेच त्यांना संपूर्ण सैन्याची कमान देण्यात आली, कारण मागील कमांडर अला अली रशीद आधीच हल्ल्यात मरण पावला होता.
- शादमानी यांनी इराणी सैन्य आणि रेव्होल्यूशनरी गार्ड या दोन्हींचे नेतृत्व केले होते. ते इराणच्या सर्वात महत्त्वाच्या लष्करी नेत्यांपैकी एक मानले जात होते. त्यांच्या मृत्यूला इराणी सैन्यासाठी मोठा धक्का मानला जात आहे.
- आज तेल अवीव आणि जेरुसलेममध्ये मोठ्या स्फोटांचे आवाज ऐकू आले. एएफपीच्या वृत्तानुसार, इस्रायलच्या अनेक भागात सायरन वाजू लागले. त्यानंतर सैन्याने सांगितले की, इराणकडून क्षेपणास्त्रे डागण्यात आली आहेत.
- इस्रायली सैन्याने एका निवेदनात म्हटले आहे की, काही वेळापूर्वी इराणकडून इस्रायलच्या दिशेने क्षेपणास्त्रे येत असल्याची माहिती मिळाल्यानंतर अनेक भागात सायरन वाजवण्यात आले होते. हवाई दल क्षेपणास्त्रे रोखण्यात आणि आवश्यक असल्यास प्रत्युत्तर देण्यात गुंतले आहे.
ब्रेकिंग! इस्रायलचा इराणवर आणखी एक शक्तिशाली हल्ला
