मुलांची नावे बॉम्ब, बंदुक आणि सॅटेलाइट ठेवा

उत्तर कोरिया आणि दक्षिण कोरिया या दोन राष्ट्रांमधील वैर प्रसिद्ध आहे. दोन्ही देशात विविध कारणावरून तणाव कायम असतो. कधी एकमेकांवर क्षेपणास्त्र डागल्याने तर कधी युद्धसरवामुळे हे दोन्ही देश कायम आमनेसामने असतात. भविष्यात होणारे युद्ध बघता उत्तर कोरियाच्या हुकूमशाह किम जोंग उनने देशातील नागरिकांसाठी अजब फतवा काढला आहे. या फतव्याची चर्चा जगात होत आहे.
जनतेत देशप्रेम वाढवण्यासाठी त्याने देशात यापुढे जन्मणाऱ्या बालकांची नावे ही बॉम्ब, बंदुक आणि सॅटेलाइट ठेवण्याचे आदेश दिले असून देशप्रेम वाढीसाठी हा निर्णय घेतला असल्याने त्याने सांगितले आहे.
भविष्यातील युद्धजन्य परिस्थिती बघता देशातील मुलांमध्ये देशप्रेम वाढावे, तसेच लष्करात तरुण पिढी दाखल व्हावी यासाठी लहाणपणापासून मुलांच्या मनामध्ये देशप्रेम जागृत व्हावे यासाठी प्रयत्न होणे गरजेचे आहे. यासाठी त्यांची नावे ही बॉम्ब, बंदुक आणि क्षेपणास्त्रांवर आधारित असावी, असे उन याने म्हटले आहे.
अशी नावे ठेवल्यास मुलांमध्ये जहाल देशभक्तीची भावना निर्माण होईल. त्यामुळे आता उत्तर कोरियामध्ये लहान मुलांची नावे बदलून चोंग इल (बंदूक), चुंग सिम (निष्ठा), पोक इल (बॉम्ब) आणि उई सॉंग (उपग्रह) यांसारखी ठेवली जाणार आहे. या आदेशामुळे जनता कंटाळली आहे.