राजकीय

ब्रेकिंग! काँग्रेसच्या हायकमांडला संजय राऊतांनी ठणकावले

  • विधानसभा निवडणुकीतील मतदानानंतर आता मतमोजणीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. उद्या मतमोजणी होणार आहे. याआधी विविध संस्थांचे एक्झिट पोल आले आहेत. काही संस्थांनी महायुती तर काही संस्थांनी महाविकास आघाडीचे सरकार येईल, असा अंदाज व्यक्त केला आहे.
  • मतदानानंतरच्या काही एक्झिट पोल्सने महायुती तर काही पोल्समध्ये महाविकास आघाडीला कौल राहिल, असा अंदाज व्यक्त करण्यात आला. यामुळे दोन्हीकडील नेते मंडळी अलर्ट मोडवर आहेत. बैठकांचे सत्र सुरू झाले आहे. अपक्ष आणि बंडखोर उमेदवारांशी संपर्क साधला जात आहे. या घडामोडी घडत असतानाच ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्रिपदाबाबत पुन्हा वक्तव्य करून खळबळ उडवून दिली आहे. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आले तर मुख्यमंत्रि‍पदाचा निर्णय महाराष्ट्रातच होईल, असे राऊत म्हणाले.
  • राऊत यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. राज्यात महाविकास आघाडीचेच सरकार येणार असल्याचा दावा केला. तसेच जर राज्यात आघाडीचे सरकार आले तर मुख्यमंत्रिपदाचा निर्णय महाराष्ट्रातच घेतला जाईल, असे सांगितले. आता त्यांचा हा इशारा महाविकास आघाडीतील कोणत्या पक्षाला दिला गेला याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे.
  • राज्यात जर महाविकास आघाडीचे सरकार आले तर मुख्यमंत्रि‍पदाचा निर्णय मुंबईतून होईल की दिल्लीतून असा प्रश्न पत्रकारांनी विचारला. त्यावर राऊत म्हणाले, मुख्यमंत्रिपदाचा निर्णय महाराष्ट्रातच होईल. शरद पवार आणि उद्धव ठाकरे मुंबईतच आहेत. काँग्रेसचे प्रमुख नेते सुद्धा दिल्लीतून महाराष्ट्रात येतील. आम्ही कोणताही वेळ न घालवता आम्ही मुख्यमंत्रि‍पदाचा निर्णय घेऊ. 

Related Articles

Back to top button