राजकीय

नाना पटोलेंच्या मनात कसली भीती?

  • विधानसभा निवडणुकीतील मतदानानंतर आता मतमोजणीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. उद्या मतमोजणी होणार आहे. याआधी विविध संस्थांचे एक्झिट पोल आले आहेत. काही संस्थांनी महायुती तर काही संस्थांनी महाविकास आघाडीचे सरकार येईल, असा अंदाज व्यक्त केला आहे.
  • यंदा मतदानाची टक्केवारी वाढली आहे. त्यामुळे वाढलेल्या मतांच्या टक्केवारी महायुती आणि महाविकास आघाडीचाही विश्वास दुणावला आहे. दरम्यान भाजपचे नेते काहीही करू शकतात. ते अदानींना पण मुख्यमंत्री करु शकतील, या खासदार संजय राऊतांच्या वक्तव्यावर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, राऊत हायकमांड आहेत. त्यांच्यावर प्रतिक्रिया देणे योग्य नाही. तसेच यावेळी त्यांनी महायुतीवर सडकून टीका केली. महायुतीत काहीतरी गडबड सुरू आहे ते काहीही पाप करू शकतात, असे पटोले म्हणाले.
  • निवडणूक आयोगाने आता नव्याने आलेल्या मतदानाच्या आकडेवारीची माहिती दिली आहे. त्यावर पटोले म्हणाले, निवडणूक आयोगाची यंत्रणा चुकीची आहे. लोकसभेत असा प्रकार झाला होता.
  • निवडणूक आयोगाकडे तक्रारी केली, तर ते बोलतात आम्ही बरोबर आहोत. आम्ही सर्व उमेदवारांना 17 सी फॉर्म बंधनकारक केला आहे. कारण त्यावेळेस कुठलीही तफावत आली तर लगेच तिथेच सापडेल, असेही पटोले म्हणाले. तसेच पोलिसांना आम्ही स्ट्राँग रुममध्ये येणाऱ्या गाड्यांची तपासणी करायला सांगितली आहे. कारण महायुतीमध्ये गडबड सुरु आहे. ते काहीही पाप करु शकतात. म्हणून स्ट्राँग रुमबाहेर संपूर्ण रात्र ते उद्या सकाळपर्यंत लक्ष ठेवणार आहोत. काही ठिकाणी अधिकारीसुद्धा गडबड करु शकतात ही आम्हाला भिती आहे, असे पटोले म्हणाले.

Related Articles

Back to top button