राजकीय
ब्रेकिंग! एक्झिट पोलवर विश्वास ठेवू नका
- विधानसभा निवडणुकीतील मतदानानंतर आता मतमोजणीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. उद्या मतमोजणी होणार आहे. याआधी विविध संस्थांचे एक्झिट पोल आले आहेत. काही संस्थांनी महायुती तर काही संस्थांनी महाविकास आघाडीचे सरकार येईल, असा अंदाज व्यक्त केला आहे. यंदा मतदानाची टक्केवारी वाढली आहे. त्यामुळे वाढलेल्या मतांच्या टक्केवारी महायुती आणि महाविकास आघाडीचाही विश्वास दुणावला आहे.
- निकालाच्या पार्श्वभूमीवर शरद पवार गटानेही तातडीने आपल्या सर्व उमेदवारांची ऑनलाईन मिटींग घेतली आहे. उद्या विधानसभा निवडणुकीचा निकाल आहे. त्याआधीच पवारांनी आपल्या उमेदवारांची ऑनलाईन मिटींग घेतली. या बैठकीला पवारांसह सुप्रिया सुळे व जयंत पाटील यांनीही मार्गदर्शन केल्याची माहिती मिळत आहे. निकालापूर्वी काही महत्त्वाच्या सूचना देण्यासाठी ही मिटींग घेतल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान, निकाल लागल्याबरोबर प्रमाणपत्र घेऊन पवारांनी त्यांच्या सर्व उमेदवारांना मुंबईला बोलावले आहे. आपले आमदार सुरक्षित ठेवण्यासाठी पवार गटाने ही रणनिती आखल्याचे बोलले जात आहे.
- राज्यात महाविकास आघाडीचेच सरकार येईल, असा विश्वास पवारांनी व्यक्त केला आहे. महाविकास आघाडीला १५७ जागा मिळतील, अशी शक्यताही त्यांनी व्यक्त केली आहे. विधानसभा निवडणूक निकालाची उत्कंठा राजकीय नेते, कार्यकर्त्यांनाच नाही तर सर्वसामान्यांनाही लागली आहे.