ब्रेकिंग! राज्यात थंडीचा कडाका वाढला
राज्यात थंडीचा कडाका वाढला आहे. अनेक जिल्ह्यात तापमान कमी झाले आहे. प्रामुख्याने पुणे, सोलापूर, सातारा, नाशिक, कोल्हापूर, नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली, जळगाव जिल्ह्यात तापमानात मोठी घट झाली आहे. येत्या काही दिवसांत तापमानात आणखी घट होणार आहे. त्यामुळे काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
सध्या राज्यात गारठा वाढला आहे. उत्तर भारतातून येणाऱ्या थंडी वाऱ्यांमुळे राज्यातील तापमानात घट झाली आहे. प्रामुख्याने विदर्भ, उत्तर महाराष्ट्र व पश्चिम माराष्ट्रातील काही जिल्ह्यात तापमान कमी झाले आहे. पुणे, निफाड आणि धुळ्यात पारा हा १०.५ अंशांवर पोहोचला आहे. त्यामुळे नागरिक थंडीने गारठले आहे. प्रामुख्याने रात्री आणि सकाळी थंडी जाणवत असून दुपारी तापमानात वाढ जाणवत आहे. राज्यात पुढील काही दिवसांनतर गारठा वाढेल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार उद्यापासून पश्चिम बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार होण्याची शक्यता आहे. त्यामुळे राज्यात वातावरणात बदल होऊन २६ पासून पुढे तापमानात बदल होण्याची शक्यता आहे.
राज्यात पुढचे काही दिवस हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे. पहाटे गारठा वाढण्याची शक्यता आहे. तर रात्री देखील तापमानात मोठी घट होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. पुढील काही दिवस तापमानात बदल होणार नसला तरी डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात थंडी वाढेल, असा अंदाज आहे.