महाराष्ट्र
वाहतूक नियम मोडणाऱ्यांचा रंग उतरवला

- राज्यभर तसेच सोलापूर परिसरात होळी आणि धुळवडीचा सण मोठ्या जल्लोषात पार पडला. एकीकडे रंगांची उधळण होत असते आणि दुसरीकडे अनेकजण बेफाम होऊन दारूच्या नशेत गाड्या चालवतात, वाहतूक नियम मोडतात.
- अशाच वाहनचालकांवर काल मुंबई पोलिसांनी नाकेबंदी करत कारवाई केली. या कारवाईमध्ये पोलिसांनी कोट्यवधी रुपयांचा दंड वसूल केला.
- धुळवडीच्या दिवशी मुंबई वाहतूक पोलिसांनी विशेष मोहीम राबवली. यादरम्यान, 1.79 कोटी रुपयांची 17,495 चालान फाडण्यात आले. मुंबई पोलिसांनी मुख्य ठिकाणी नाकाबंदी करून वाहनांची तपासणी केली. या काळात नियम मोडणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात आली.
- मुंबई पोलीस आणि वाहतूक विभागाने होळी आणि धुळवड म्हणजेच दोन दिवस वाहतूक नियमांचं उल्लंघन रोखण्यासाठी विशेष मोहीम राबवली होती. या कालावधीत, नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल 17,495 वाहन चालकांवर कारवाई करण्यात आली. या कारवाईतून तब्बल एक कोटी 79 लाख 79 हजार 250 रुपये वसूल करण्यात आले आहेत.
- या मोहिमेअंतर्गत मद्यपान करून वाहन चालवणे, वेगमर्यादा ओलांडणे, हेल्मेट न घालता दुचाकी चालवणे, बाईकवरून तीन जणांसह प्रवास करणे यासह इतर वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या चालकांवर कारवाई करण्यात आली आहे.