ब्रेकिंग! वनराज आंदेकर खून प्रकरण : पुन्हा नवी घडामोड

पुण्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांच्या खून प्रकरणातील टोळी प्रमुख गणेश कोमकर आणि सोमनाथ गायकवाड यांना एक ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. मोक्का न्यायालयाचे विशेष न्यायाधीश व्ही आर कर्चे यांनी हा निर्णय दिला आहे.
गणेश लक्ष्मण कोमकर (वय ३७, रा. पालखी विठोबा चौक, भवानी पेठ) आणि सोमनाथ सयाजी गायकवाड याला दोन सप्टेबर रोजी अटक केली होती. गणेश याची १५ सप्टेबर तर, सोमनाथची १६ सप्टेबरला न्यायालयीन कोठडी मंजुरी झाली होती. मोक्का न्यायालयाच्या प्रॉडक्शन वॉरंटने पोलिसांनी दोघांना सायंकाळी येरवडा कारागृहातून ताब्यात घेऊन काल विशेष न्यायालयात तपास अधिकारी सहायक पोलीस आयुक्त गणेश इंगळे यांनी हजर केले.
सरकारी वकील राजेश कावेडिय यांनी न्यायालयाला सांगितले की, वनराज यांचा खून टोळी युद्धातून झाला आहे. तसेच गुन्हा करण्यामागे अन्य आणखी कोण सहभागी आहेत, त्याचा तपास करायचा आहे. यामध्ये आतापर्यंत २१ आरोपी अटक करण्यात आले आहेत.