सोलापूर

सोलापूर ब्रेकिंग! भाजपमध्ये भलतीच घडामोड

सोलापूर शहर उत्तर भाजपमध्ये बंड का आहे ? शहर उत्तरचे आमदार विजयकुमार देशमुख यांचा  पत्ता कट होण्याची दाट शक्यता आहे. आज शिवानुभव मंगल कार्यालय येथे सोलापूर शहर उत्तर भाजपच्यावतीने कार्यकर्ता संवाद बैठक आयोजित करण्यात आले होते. मुख्य म्हणजे या बैठकीस भाजपचे शहराध्यक्ष नरेंद्र काळे  उपस्थित नव्हते. या बैठकीस शहर उत्तर मधील कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येने होते. यावेळी आमदार विजयकुमार देशमुख यांच्यावर नाराजीचे सूर दिसून आले. गेल्या वीस वर्षे आमदार असताना आपल्या मतदारसंघात काम ही नाही केले. कार्यकर्त्यांची विचार केला नाही. जे आपले बगलबच्चे आहेत त्यांचे विचार त्याने केला. ह्या बैठकीस एका कार्यकर्त्यांची अशी मागणी होती की,  आमदार विजयकुमार देशमुख यांच्या मनमानी कारभाराला कंटाळून गेलेल्या भाजपचे माजी शहर अध्यक्ष सध्या काँग्रेसचे प्रवक्ते असलेले प्राचार्य अशोक निम्बर्गी यांना पुन्हा एकदा पक्षात प्रवेश द्यावे. या बैठकीत असे ठरले की आमदार विजयकुमार देशमुख शहर उत्तरचे उमेदवारी देऊ नये दिल्यास त्याचे पराभव करू लोकसभेला जे झालं ते शहर उत्तरला होईल.

बैठकीस सोलापूर शहर उत्तरचे इच्छुक उमेदवार चनवीर चिट्टे, माजी महापौर शोभा बनशेट्टी, श्रीशैल बनशेट्टी, विधीतज्ञ मिलिंद थोबडे, माजी नगरसेवक सुरेश पाटील, जगदीश पाटील अशोक खटके, दिलीप पतंगे, राजाभाऊ माने,  अमर बिराजदार, सागर आतनुरे, संजय साळुंखे, अक्षय अंजीखाने,  यतीराज होनमाने, विनोद गडगी व बहुसंख्येने भाजप कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.

Related Articles

Back to top button