राजकीय
ब्रेकिंग! यंदा शहरी मतदार जागरूक झाले, मतदान केंद्रावर गर्दी दिसू लागली
- राज्यात विधानसभा निवडणुकीसाठी आज मतदान होत असून, त्यात ४,१३६ उमेदवारांचे भवितव्य ठरणार आहे. सकाळी सात वाजल्यापासून मतदानाला सुरूवात झाली आहे. दरम्यान, लोकसभा निवडणुकीत शहरी भागात कमी मतदान झाल्याने याच फटका उमेदवारांना बसला होता. त्यामुळे विधानसभेतही शहरी मतदान हे निर्णायक ठरणार आहे. राज्यभरात आज विधानसभा निवडणुकीसाठी मतदान होणार आहे.
- या संपूर्ण प्रक्रियेसाठी राज्यभरामध्ये तब्बल पाच लाखांपेक्षा जास्त कर्मचारी तैनात करण्यात आलेले आहेत. तर संपूर्ण राज्यात 1 लाख 427 मतदान केंद्र देखील सज्ज करण्यात आलेली आहेत. दरम्यान, सोलापूर जिल्ह्यातील विविध मतदारसंघांमध्ये उस्फूर्तपणे मतदान होत आहे. मतदान केंद्रावर मतदारांच्या रांगा दिसत आहेत. मुंबई, पुणे, सोलापूर, कोल्हापूर, सांगली यासारख्या मोठ्या शहरांमध्ये मतदानाला मोठा प्रतिसाद मिळत आहे.
- यंदाच्या विधानसभा निवडणुकीत शहरी भागातील मतदार मतदानासाठी घराबाहेर पडत आहेत. विविध मतदान केंद्रावर मोठ्या प्रमाणात गर्दी दिसून येत आहे. महाराष्ट्रात दुपारी एक वाजेपर्यंत 32 टक्के मतदान झाले आहे.