राजकीय

बारामतीमध्ये जोरदार राडा

  • राज्यात विधानसभा निवडणुकीसाठी आज मतदान होत असून, त्यात ४,१३६ उमेदवारांचे भवितव्य ठरणार आहे. सकाळी सात वाजल्यापासून मतदानाला सुरूवात झाली आहे. दरम्यान, बारामती विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे उमेदवार युगेंद्र पवार यांच्या आई शर्मिला पवार यांनी गंभीर आरोप केले आहे. कार्यकर्त्यांना जीवे मारण्याची धमकी दिली जात असून दमदाटी करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. यासोबतच मतदारांना घड्याळाचे शिक्के असलेल्या स्लीप वाटल्या जात असल्याच देखील त्यांनी सांगितले. या प्रकरणी निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार करणार असल्याचे पवार म्हणाल्या.
  • राज्यासह सर्व देशाचे लक्ष लागून असलेल्या बारामतीमध्ये अनेक नाट्ययमी घडामोडी पाहायला मिळत आहे. या ठिकाणी बारामतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रमुख अजितदादा पवार व त्यांचे पुतणे विरुद्ध युगेंद्र पवार असा सामना आहे. बारामती मतदारसंघात विधानसभा निवडणुकीसाठी मतदान सुरु असताना या ठिकाणी अजितदादा गट आणि शरद पवार गट यांच्यात राडा झाला आहे. उमेदवार युगेंद्र पवार यांच्या आई शर्मिला पवार यांनी अजितदादा गटावर मतदारांना दमदाटी केल्याचा आरोप केला आहे. शर्मिला पवार म्हणाल्या, काही मतदारांना माझ्यासमोर दमदाटी करण्यात आली. दमदाटी करणारी व्यक्ति माझ्यासमोर उभी होती. ती व्यक्ति मतदान केंद्राच्या आत स्वत:च्या घरातलं लग्न कार्य असल्यासारखं वावरत येणाऱ्या मतदारांना खाणा खुणा केल्या करत असल्याचे पवार म्हणाल्या.

Related Articles

Back to top button