ब्रेकिंग! सोलापूर जिल्ह्यातून प्रणिती शिंदे यांचे नामोनिशान मिटवणार
राज्यात आज विधानसभेसाठी मतदान होत आहे. मात्र, सकाळपासून अनेक नाट्यमय घडामोडी राज्यात पाहायला मिळत आहे. सोलापूरमध्ये काँग्रेसने उद्धव ठाकरे गटाशी दगाफटका केला आहे. सोलापूर दक्षिणमध्ये काँग्रेसने ठाकरे गटाच्या अमर पाटील यांच्या ऐवजी अपक्ष उमेदवार धर्मराज काडादी यांना पाठिंबा दिल्याने महाविकास आघाडीमध्ये आता बिघाडी झाली आहे. खासदार प्रणिती शिंदे व माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्यावर ठाकरे गटाचे उपनेते शरद कोळी यांनी सडकून टीका केली आहे. प्रणिती शिंदे या भाजपची बी टीम असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
सुशीलकुमार शिंदे म्हणाले, सोलापूर दक्षिण मतदारसंघ ऐतिहासिकदृष्ट्या काँग्रेसकडे राहिला आहे. प्रणिती शिंदे म्हणाल्या, हा मतदारसंघ काँग्रेसचा बालेकिल्ला आहे आणि सुशीलकुमार शिंदे हे देखील येथून विजयी झाले आहेत. आतापर्यंत आम्ही आघाडी धर्माचे आचरण करत होतो. पण इथे पंढरपूरसारखी मैत्रीपूर्ण लढत शक्य नव्हती. अशा परिस्थितीत आम्ही अपक्ष उमेदवाराला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला.
यावेळी ठाकरे गटाचे उपनेते शरद कोळी यांनी सुशीलकुमार आणि प्रणिती यांच्यावर गंभीर आरोप केले. दोघेही बाप लेक हे भाजपची बी टीम असल्याचे कोळी म्हणाले. शिंदे यांनी भाजपसोबत आतून हातमिळवणी केली आहे. मात्र, शिंदे कुटुंबाची ही शेवटची खासदारकी असून यापुढे तुम्हाला खासदारकी मिळणार नाही, असा इशारा कोळी यांनी शिंदे यांना दिला आहे.