सोलापूर
सोलापुरात प्रणिती शिंदे, सुशीलकुमार शिंदेंचा ठाकरेंना झटका
- राज्यात विधानसभा निवडणुकीसाठी आज मतदान होत असून, त्यात ४,१३६ उमेदवारांचे भवितव्य ठरणार आहे. सकाळी सात वाजल्यापासून मतदानाला सुरूवात झाली आहे. दरम्यान, दक्षिण सोलापूर मतदारसंघात उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला धक्का बसला आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, सुशीलकुमार शिंदे आणि खासदार प्रणिती शिंदे यांनी दक्षिण सोलापुरातील अपक्ष उमेदवाराला पाठिंबा दिला आहे. ऐन मतदानाच्या दिवशी प्रणिती शिंदे यांनी ही भूमिका स्पष्ट केल्याने राजकीय वर्तुळात एकच चर्चांना उधाण आले आहे.
- दक्षिण सोलापुरात शिवसेनेने ( ठाकरे गट ) अमर पाटील यांना उमेदवारी दिली. काँग्रेसचे दिलीप माने येथून लढण्यास इच्छुक होते. तर, सिद्धेश्वर परिवाराचे प्रमुख धर्मराज काडादी यांनी अपक्ष अर्ज दाखल केला होता. मात्र, दिलीप माने यांना काँग्रेसकडून ‘एबी’ फॉर्म मिळाला नसल्याने त्यांनी माघार घेतली. तर, माने यांनी काडादी यांना पाठिंबा दिला. यातच प्रणिती शिंदे यांनी अखेरच्या क्षणी काडादी यांच्या पाठीशी असल्याचे सांगितले आहे. त्यामुळे अमर पाटील यांच्या अडचणी वाढल्या आहेत.