राजकीय

ब्रेकिंग! एक्झिट पोल खरे ठरले

सत्ताधारी आम आदमी पक्षाची धुळधाण करत भाजपने दिल्ली विधानसभा निवडणुकीत दणदणीत विजय मिळविला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या चेहऱ्यावर भाजपने ही निवडणूक लढवली होती. प्राथमिक आकडेवारीनुसार भाजपा 70 पैकी तब्बल 46 जागा जिंकताना दिसत आहे. तर अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वातील आम आदमी पक्षाला अवघ्या 23 जागांवर यश मिळताना दिसत आहे. दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या एकूण 70 जागांसाठी बुधवारी मतदान पार पडले होते. त्यानंतर हाती आलेल्या एक्झिट पोलच्या आकड्यांमध्ये 37 ते 40 जागांसह भाजपचे सरकार स्थापन होऊ शकते असा अंदाज वर्तवण्यात आला होता. तर एक्झिट पोलच्या आकड्यांवर आमचा विश्वास नाही. दिल्लीत आम आदमी पक्षच सरकार स्थापन करणार असा दावा करण्यात आला होता. त्यामुळे निकालात काय होणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले होते.

Related Articles

Back to top button