राजकीय
ब्रेकिंग! प्रचाराच्या शेवटच्या तासात राहुल गांधींचा ‘पोस्टर बॉम्ब’
- विधानसभा निवडणूक प्रचाराचा आजचा शेवटचा दिवस आहे. आज संध्याकाळी पाच वाजता प्रचार थांबविण्यात येणार आहे. दरम्यान आज काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेतली. यावेळी माध्यमांसोबत बोलताना राहुल म्हणाले की, ही निवडणूक विचारधारेची निवडणूक आहे. अरबपती आणि गरिबांमधील ही निवडणूक आहे. अरबपतींना वाटतंय की, मुंबईची जमिन त्यांना मिळाली. यासाठी एक लाख करोडोचे इस्टिमेट आहे. एका अरबपतीला एक लाख करोड देण्याची चर्चा झाली. आम्हाला असे वाटतंय की, महाराष्ट्रातील गरिब, शेतकरी आणि बेरोजगार तरूणांना मदतीची गरज आहे.
- आमचे लक्ष्य महिलांना मदत करण्याचे आहे. शेतकऱ्यांचे कर्ज माफ करून पिकांना योग्य भाव द्यायचा असल्याचे राहुल म्हणाले. पत्रकार परिषदेमध्ये बोलताना राहुल यांनी अदानी आणि पंतप्रधान मोदी यांच्यावर निशाणा साधला. ते म्हणाले की, धारावीतील छोट्या उद्योगधंद्यांना संपवले जात आहे. मोदी आणि अदानी यांचे नाते जुने आहे. मोदींचा नारा, एक है तो सेफ है, यावरून राहुल यांनी मोदींवर टिका केली. तिजोरी दाखवत अदानी आणि मोदींवर लक्ष केले. एक म्हणजेच मोदी, शहा, अदानी. धारावीतील जमीन हिसकावून अदानीला दिली जातेय, असा आरोप राहुल यांनी केला.