सोलापूर
निवडणूक महाराष्ट्राची पण तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांची चर्चा का?
- विधानसभा निवडणूक प्रचाराचा आजचा शेवटचा दिवस आहे. आज संध्याकाळी पाच वाजता प्रचार थांबविण्यात येणार आहे. तसेच अधिसूचना जारी झाल्यापासून 28 दिवस निवडणूक प्रचार सुरू होता. त्यानंतर आज सर्व नेते आपआपल्या होमग्राऊंडवर सभा आणि पदयात्रा आहेत. प्रचार आता शेवटच्या टप्प्यात आहे. सर्वच राजकीय पक्षांनी जोर लावला आहे. शिवाय केंद्रीय नेतेही प्रचारासाठी महाराष्ट्रात दाखल झाले आहे.
- काही राज्यांचे मुख्यमंत्रीही प्रचारात सहभागी झाले आहेत. पण यात जर कोणाची चर्चा होत असेल तर ती तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांची आहे. रेड्डी यांनी तेलंगणाच्या सीमेवरील जिल्ह्यात प्रचाराचा धुरळा उडवला आहे. शिवाय त्यांनी भाजप नेते अशोक चव्हाण यांना हैराण केले आहे. मुंबईतही आदित्य ठाकरेंसाठी याच रेड्डी यांचा रोड शो झाला होता. त्यांच्या हिंदी भाषणांना सीमेवरील जिल्ह्यात मोठा प्रतिसादही मिळत आहे. त्यामुळे राज्याच्या निवडणुकीत रेड्डींची चर्चा सर्वात जास्त होत आहे.
- दरम्यान सोलापूर शहर उत्तर विधानसभा मतदारसंघ महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार महेश विष्णुपंत कोठे यांच्या प्रचारार्थ तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांची जाहीर सभा पार पडली. महाराष्ट्रातील जनतेनं असं सरकार निवडावं कि, पक्षांची फोडा-फोडी करून जनाधाराचा अवमान करून फक्त जे केवळ सत्तेसाठी नाही, तर सामान्य जनतेच्या भल्यासाठी कार्यरत राहील. एकीकडे महाविकास आघाडी विकासाच्या मुद्द्यांवरून निवडणुकीला सामोरे जात आहे. तर महायुती जाती-धर्माचा आधार घेऊन फक्त ध्रुवीकरण करत आहे. गलिच्छ आणि स्वार्थी राजकारण करणाऱ्यांना धडा शिकवण्याची वेळ आता आली आहे. त्यांनी जनतेला आवाहन केले की, विकास आणि पारदर्शकतेला प्राधान्य देण्यासाठी काँग्रेस आणि महाविकास आघाडीच्या सर्व उमेदवारांना विक्रमी मतांनी विजयी करून महाविकास आघाडीची सत्ता आणावी, असे आवाहन केले.