सोलापूर

सोलापुरात शिंदे गटाच्या प्रचार रॅलीवर दगडफेक

  • विधानसभा निवडणूक प्रचाराचा आजचा शेवटचा दिवस आहे. आज संध्याकाळी पाच वाजता प्रचार थांबविण्यात येणार आहे. दरम्यान, बार्शीतील तळेवाडी येथे शिवसेना (शिंदे गट ) महायुतीचे उमेदवार राजेंद्र राऊत यांच्या प्रचारार्थ काढलेल्या शिवसेनेच्या महिला पदयात्रेवर दगडफेक झाल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी शहर पोलिसांत चारजणांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला असून शनिवारी रात्रीच्या सुमारास हा प्रकार घडला.
  • याप्रकरणी शहाजी काशिनाथ जाधव (रा. बार्शी) यांनी शहर पोलिसांत दिलेल्या फिर्यादीनंतर कृष्णा रजपूत, संपत जाधव, प्रशांत जाधव व शिवाजी जाधव या चारजणांविरुध्द शहर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 
  • फिर्यादीत म्हटले आहे की, शिवसेना मुहायुतीचे उमेदवार राजेंद्र राऊत यांच्या प्रचारार्थ शनिवारी तळेवाडी परिसरात महिलांची पदयात्रा काढण्यात आली. ही पदयात्रा गणपती मंदिरासमोर आली असता, पदयात्रेतील शिवसैनिकांकडे पाहून तुमचा रॅली काढायचा संबंध काय. हा इलाका माझा आहे असे म्हणत रजपूत यांनी धमकी दिली. यानंतर बाजूला उभा असलेले संपत जाधव यांनी शिविगाळ केली तर शिवाजी जाधव व प्रशांत जाधव यांनी विटांचे तुकडे उचलून पदयात्रेवर फेकले. 
  • यात फिर्यादी शहाजी जाधव यांच्या डोक्याला मार लागून ते जखमी झाले. तर प्रशांत जाधव यांनी मारलेला विटेचा तुकडा मुक्ताबाई चौधरी यांना लागल्याने त्याही जखमी झाल्या. दोन्ही जखमींना उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. या प्रकरणानंतर पोलिस अधिकारी तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. 

Related Articles

Back to top button