राजकीय
नितीन गडकरी मुख्यमंत्रीपदाचे दावेदार?
- विधानसभा निवडणुकीचे मतदान काही दिवसांवर येवून ठेपले आहे. दरम्यान, प्रचाराच्या तोफा थंड व्हायला काही दिवस उरले आहेत. एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. मुख्यमंत्री कोण होणार ही चर्चा राज्यात आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी अलीकडे जाहीर सभेत देवेंद्र फडणवीस यांचे नाव घेतल्याने एकच गोंधळ उडला. त्यानंतर भाजपकडून सारवासारव करण्यात आली. याच दरम्यान केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना राज्याचा मुख्यमंत्री कोण होईल, असा प्रश्न विचारण्यात आला होता.
- त्यावेळी प्रश्नाचा रोख त्यांच्या लक्षात आला. त्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलले. तेव्हा अनेकांची विकेट पडली. पण त्याचवेळी गडकरी यांनी आपण महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदाचे दावेदार नसल्याचे सांगितले. मला मुख्यमंत्री व्हायचे नसल्याचे ते म्हणाले. जर कोणी आग्रह केला, मला संधी दिली तरीही मी मुख्यमंत्री होणार नसल्याचे ते म्हणाले. पक्षातील वरिष्ठ नेते मुख्यमंत्री कोण होईल, याचा निर्णय घेतील, अशी महत्त्वपूर्ण वक्तव्य त्यांनी केले आहे.