ब्रेकिंग! विनोद तावडे यांचा नवा राजकीय बॉम्ब
विधानसभा निवडणुकीचे मतदान काही दिवसांवर येवून ठेपले आहे. दरम्यान, प्रचाराच्या तोफा थंड व्हायला काही दिवस उरले आहेत. एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. मुख्यमंत्री कोण होणार ही चर्चा राज्यात आहे.
महाविकास आघाडी आणि महायुतीने मुख्यमंत्रीपदाचा चेहरा अद्याप जाहीर केला नाही. एकीकडे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या वक्तव्याचा आधार घेत संख्याबळ ज्याचे जास्त त्याचा मुख्यमंत्री असा पवित्रा घेतला आहे. तर दुसरीकडे भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांनी संख्या बळावर महायुतीचा मुख्यमंत्री ठरणार नसल्याचे सांगितले.
भाजपामध्ये ज्या गोष्टीची चर्चा असते ते शंभर टक्के होत नाहीच. राष्ट्रीय स्तरावर काम करताना आनंद मिळतोय. मी वीस वर्ष आमदार होतो. पाच वर्ष नऊ खात्याचा मंत्री होतो. अशी नऊ खाती की आधीच्या सरकारमध्ये नऊ जण सांभाळत होती. नंतर परत आठ जण सांभाळत होती. अशी नऊ खाती एकत्र सांभाळली. आता राष्ट्रीय स्तरावर काम करण्याची संधी मिळते त्याचा आनंद आहे. दिल्लीत राहावे, राष्ट्रीय पातळीवरचे राजकारण करावेसे वाटते. ओन्ली राष्ट्र, नो महाराष्ट्र, असे तावडे म्हणाले.
मुख्यमंत्रीपदाची चर्चा निवडणुकीनंतर करू, असे पक्षाने ठरवले आहे. संख्याबळावर मुख्यमंत्री ठरणार नाही. निवडणुकीनंतर बसवून ठरवू. ज्याचे आमदार जास्त तो होईल किंवा बिहारमध्ये आम्ही नितीश कुमार केले. आमचे आमदार जास्त पण नितीश कुमार झाले. पण त्या त्यावेळच्या राजकीय परिस्थितीवर लक्षात घेऊन करावे लागेल. महाराष्ट्राच्या हिताचे पाहून निर्णय घ्यावा लागेल, असे तावडे यांनी स्पष्ट केले.