सोलापूर

महाविकास आघाडीचा प्रचार पाहून भाजप उमेदवारांना धडकी भरली

  • महाविकास आघाडीचे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे उमेदवार महेश कोठे याना शहर उत्तर मतदार संघातून दिवसेंदिवस नागरिकांचा पाठींबा वाढत चालला आहे, मतदानासाठी अवघे काही दिवस राहिले असून प्रचार चांगलाच तापला आहे, होम टू होम, पदयात्रा कॉर्नर बैठका मधून महेश कोठे हे मतदारांच्या घरोघरी जात आहेत.
  • दरम्यान गुरुवारी सकाळी प्रभाग क्रमांक एक मध्ये महेश कोठे यांच्या पदयात्रेला नागरिकांनी मोठी गर्दी केली होती, या पदयात्रेत महेश कोठे यांच्यासोबत खासदार प्रणिती शिंदे ह्या देखील सहभागी झाल्या होत्या. यावेळी ठिकठिकाणी महेश कोठे यांचे औक्षण करून आणि पुष्पहार घालून स्वागत करण्यात आले
  • महाविकास आघाडीचे उमेदवार खूप चांगल्या प्रकारे प्रचार करत असल्याने भाजपच्या उमेदवारांना धडकी भरली असून यंदा महाविकास आघाडीचे उमेदवार विजयी होतील, असा विश्वास खासदार प्रणिती शिंदे यांनी व्यक्त केला.
  • जे लोक आजपर्यंत सांगत होते आमची व्होट बँक आहे, त्या मारवाडी समाजाचा देखील आज मला आशीर्वाद मिळाल्याचे महेश कोठे म्हणाले.
  • एखादा माणूस नगरसेवक होऊन विकास करू शकतो तर आमदार झाल्यावर किती विकास करू शकेल, यंदा च्या वर्षी आपल्याला बदल घडवण्याचीसंधी मिळाली असून या संधीच सोन करू, असे या भागातील नागरिक म्हणाले.

Related Articles

Back to top button