राजकीय
ब्रेकिंग! उद्धव ठाकरे यांना धक्का
- ऐन विधानसभेच्या तोंडावर शिवसेना उबाठा नेते उद्धव ठाकरे यांना धक्का बसला आहे. उध्दव बाळासाहेर ठाकरे पक्षाचे कल्याणमधील उपनेते विजय उर्फ बंड्या साळवी यांनी उपनेतेचा पदाचा राजीनामा दिला आहे. उद्धव ठाकरे यांच्याकडे त्यांनी हा राजीनामा दिला आहे. यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. अंतर्गत राजकारणामुळे आपण पक्ष सोडत असल्याचे त्यांनी सांगितले.
- कल्याणमधील पदे देताना संघटनात्मक बाबी आणि सचिन बासरे यांना उमदेवारी देताना आपल्याला विश्वासात घेतले नाही. या सगळ्या घाणेरड्या राजकारणामुळे व्यथित होऊन पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला, असे साळवी यांनी पत्रात म्हटले आहे.
- कल्याणमधील शिवसेनाप्रमुखांच्या विचारांचा निष्ठावान शिवसैनिक म्हणून साळवी यांची ओळख होती. शिवसेनेमध्ये जेव्हा बंड झाले, तेव्हा साळवी हे उद्धव यांच्यासोबत होते. त्यांनी शिंदे गटात यावे म्हणून त्यांच्यावर विविध प्रकारे दबाव, पोलिस दबावतंत्राचा वापर करण्यात आला, असा खुलासा देखील साळवी यांनी केला.
- आपण निष्ठावान राहिल्याने पक्षाने आपणास जिल्हाप्रमुख, उपनेतेपद दिले. मात्र, अचानक आपले जिल्हाप्रमुख पद काढून घेतले. पक्ष संघटनेत पदे देताना आपणास विश्वासात घेतले नाही याची खंत साळवी यांनी पत्रात व्यक्त केली. त्यांनी बासरे यांना देण्यात आलेल्या उमेदवारीवरूनही नाराजी व्यक्त केली आहे.