सोलापूर
पालकमंत्री असताना आमदार देशमुख यांनी शेळगीसाठी काय केले; महेश कोठे यांचा खणखणीत सवाल
- शहर उत्तर विधानसभा मतदार संघाचे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे उमेदवार महेश कोठे यांनी प्रचारात मोठी बाजी मारली असून ठिकठिकाणी महेश कोठे याना जनतेचा प्रतिसाद मिळत आहे, ठिकठिकाणी औक्षण आणि पुष्पहार घालून महेश कोठे यांचे स्वागत करण्यात येत आहे, दरम्यान शेळगी परिसरात मंगळवारी प्रचारार्थ राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे उमेदवार महेश कोठे यांची पदयात्रा काढण्यात आली.
- ही पदयात्रा शेळगी ब्रिज, जि. प. शाळा शेळगी, पोलीस चौकी, बाळशेट्टी नगर, शिवगंगा नगर, धर्मराज नगर, महालक्ष्मी नगर, योगायोग नगर, तिरुपती बालाजी सोसायटी, आदर्श नगर, कुमारस्वामी नगर, मित्र नगर मेन रोड, जयलक्ष्मी नगर, नटराज नगर, बसवेश्वर नगर, राही मंगल कार्यालय मार्गे काढण्यात आली. यावेळी पुष्पवृष्टी करून आणि पुष्पहार घालून त्यांचे स्वागत करण्यात आले. पदयात्रेत नागरिकांनी प्रचंड गर्दी केल्याने पदयात्रेस जत्रेचे स्वरूप प्राप्त झाले होते.
- दरम्यान पालकमंत्री असताना विजयकुमार देशमुख हे शेळगी परिसरासाठी काही करू शकले नाही तसेच वीस वर्षांत काही विकास करू शकले नाही, मी नगरसेवक असताना केलेली कामे अजूनही शेळगीकरांच्या लक्षात आहे. त्यामुळे यंदाच्या वेळेस संपूर्ण शेळगी परिसरातील नागरिक माझ्या सोबत असून मला प्रचंड मतांनी विजयी करतील, असा विश्वास महेश कोठे यांनी व्यक्त केला.