राजकीय

राज्यात मुख्यमंत्री पदासाठी पहिली पसंती कोणाला?

  1. सध्या संपूर्ण राज्यात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. सर्वच राजकीय पक्षाकडून केल्या जात झालेल्या प्रचारामुळे निवडणुकीतील रंगत आणखी वाढली आहे. दरम्यान, निवडणुकीबाबत सर्वच राजकीय पक्ष आपापल्या विजयाचे वेगवेगळे दावे करत आहेत. अशा स्थितीत मुख्यमंत्री म्हणून राज्यातील जनतेची पहिली पसंती कोणाला, हा मोठा प्रश्न आहे. राज्यात महायुतीकडून एकनाथ शिंदे हे अजूनही मुख्यमंत्रिपदाचे दावेदार आहेत आणि महाविकास आघाडीच्या बाजूने आत्ताच काही सांगणे कठीण आहे. मात्र, वेगवेगळ्या नावांची चर्चा सुरू आहे.
  2. दरम्यान, यावेळी महाराष्ट्रातील जनतेला मुख्यमंत्रीपदावर कोणाला पाहायचे आहे, हे पाहण्याचा प्रयत्न या सर्वेक्षणाच्या माध्यमातून करण्यात आला आहे. मॅटेराइजच्या सर्वेक्षणानुसार, राज्याच्या मुख्यमंत्रिपदासाठी एकनाथ शिंदे सर्वाधिक पसंतीचा चेहरा राहिला आहे. राज्यातील जनतेला जेव्हा विचारण्यात आले की, मुख्यमंत्रीपदासाठी तुमची निवड कोणाला आहे, तेव्हा 40 टक्के लोकांनी शिंदे यांच्या बाजूने सहमती दर्शवली.
  3. 65 टक्केपेक्षा जास्त लोकांनी शिंदे यांच्या कार्याबद्दल समाधान व्यक्त केले आहे, ज्यामध्ये 42 टक्के लोकांनी ते खूप चांगले आहे आणि 27 टक्के लोकांनी ते सरासरी असल्याचे सांगितले आहे. तर मुख्यमंत्रीपदासाठी उद्धव ठाकरे यांना २१ टक्के आणि देवेंद्र फडणवीस यांना १९ टक्के लोकांनी पाठिंबा दिला आहे. 2024 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपच्या खराब कामगिरीच्या संभाव्य कारणांबद्दल विचारले असता, सुमारे 48 टक्के लोकांनी शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यातील फूट हे कारण दिले.

Related Articles

Back to top button