राजकीय
ब्रेकिंग! महाविकास आघाडीला मिळणार 160 ते 165 जागा
- सध्या संपूर्ण राज्यात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. सर्वच राजकीय पक्षाकडून केल्या जात झालेल्या प्रचारामुळे निवडणुकीतील रंगत आणखी वाढली आहे. दरम्यान, या निवडणुकीत महाविकास आघाडीला किती जागा मिळणार याचा आकडाच खासदार संजय राऊत यांनी सांगून टाकला आहे. महाविकास आघाडीला 160 ते 165 जागा मिळणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. आज ते मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते.
- राऊत म्हणाले, लोकसभेला सर्व्हे आले होते. त्यात महाविकास आघाडीला दहा जागा मिळणार नाहीत असे म्हटले होते. पण, आम्ही 31 जागा जिंकल्या. नरेंद्र मोदी चारशे पार असाही सर्व्हे होता. पण बहुमत मिळाले नाही. महायुतीचे लोक कुठूनही सर्व्हे करुन घेतील आणि लोकांमध्ये भ्रम निर्माण करतील हे सांगता येत नाही. महाराष्ट्राची जनता जागरुक आणि सावध आहे.
- राऊत म्हणाले, आम्हाला 160 ते 165 जागा मिळणार आहेत. आमचे सर्व प्रयत्न सुरु आहेत. चोऱ्या, माऱ्या करुन ज्या जागा जिंकण्याचा प्रयत्न भाजप करत आहे, तिथे आम्ही सावध राहायला सांगितले आहे. पैशांचे वाटप, ईव्हीएम बॅटरी असे अनेक विषय आहेत. त्यामुळे आम्ही सावध आहोत.