सोलापूर
सोलापुरात ‘ईलेक्शन फिवर’
- सध्या संपूर्ण राज्यात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. सर्वच राजकीय पक्षाकडून केल्या जात झालेल्या प्रचारामुळे निवडणुकीतील रंगत आणखी वाढली आहे. दरम्यान, विधानसभा निवडणुकीतील भाजप आणि महायुतीच्या जिल्ह्यातील सर्व उमेदवारांच्या प्रचारार्थ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जाहीर सभा मंगळवारी दुपारी २ वाजता होम मैदानावर आयोजित करण्यात आल्याची माहिती भाजपचे प्रदेश सरचिटणीस राजेश पांडे यांनी दिली.
- पांडे म्हणाले, महायुती सरकारने हजारो कोटी रुपयांचा निधी देऊन विकासाच्या योजना राबवल्या आहेत. महिला, शेतकरी, ज्येष्ठ नागरिक, तरुण, कामगार अशा सर्व क्षेत्रातील नागरिकांना सक्षम सुशासन देण्याचे काम मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील केले आहे. प्रामाणिक हेतूने राज्याचा विकास करणाऱ्या महायुतीला जनतेचा पाठिंबा मिळत आहे. विधानसभा निवडणुकीबाबत सोलापूरकरांशी संवाद साधण्यासाठी मोदी सोलापुरात येत असून या सभेसाठी एक लाख नागरिक उपस्थित राहतील, असा विश्वासही पांडे यांनी व्यक्त केला.