राजकीय

काँग्रेसने घाव घातलाच, बंडखोरांना क्षमा नाही..!

सध्या संपूर्ण राज्यात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. सर्वच राजकीय पक्षाकडून केल्या जात झालेल्या प्रचारामुळे निवडणुकीतील रंगत आणखी वाढली आहे. दरम्यान, विधानसभा निवडणुकीत जवळपास सर्वच पक्षांत बंडखोरी आणि नाराजी उफाळून आली. तिकीट मिळाले नाही म्हणून एकतर अपक्ष किंवा दुसऱ्या पक्षांच्या तिकीटावर निवडणूक लढणारे अनेक उमेदवार रिंगणार उतरले आहेत.

काँग्रेसही याला अपवाद नाही. बंडखोरीची लागण काँग्रेसला मोठ्या प्रमाणात झाली आहे. या बंडखोरीची दखल पक्ष नेतृत्वाने घेतली असून या उमेदवारांवर कारवाईचा बडगा उगारला आहे. बंडखोरी करत विधानसभा निवडणूक लढणाऱ्या १६ उमेदवारांची सहा वर्षांसाठी पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या सूचनेवरून पक्षाने या बंडखोरांना बाहेरचा रस्ता दाखवला आहे. दरम्यान, याआधी सहा उमेदवारांना पक्षातून निलंबित करण्यात आले होते. पक्षाचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्निथला यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली होती.

त्यानंतर आता आणखी काही बंडखोर उमेदवारांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. यामध्ये आरमोरीमध्ये आनंदराव गेडाम, शिलू चिमूरकर, गडचिरोलीतील सोनल कोवे, भरत येरमे, बल्लारपूरमधील अभिलाषा गावतूरे, राजू झोडे, भंडाऱ्यातील प्रेमसागर गणवीर, अर्जुनी मोरगावमधील अजर लांजेवार, भिवंडीतील विलास रघुनाथ पाटील, आसमा चिखलेकर, मिरा भाईंदरमधील हंसकुमार पांडे, पलूस कडेगावमधील मोहनराव दांडेकर आदींचा समावेश आहे.

Related Articles

Back to top button