ब्रेकिंग! विधानसभा निवडणुकीचा पहिला ओपिनियन पोल
सध्या संपूर्ण राज्यात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. सर्वच राजकीय पक्षाकडून केल्या जात झालेल्या प्रचारामुळे निवडणुकीतील रंगत आणखी वाढली आहे. दरम्यान, राज्यात कुणाचे सरकार स्थापन होणार याबाबत एक सर्व्हे समोर आला आहे, ज्यात दावा करण्यात आला आहे की, राज्यात महायुतीचे सरकार स्थापन होऊ शकते.
आयएएनएस माध्यम समुहाने राज्यात नेमके कुणाचे सरकार येणार याबाबत सर्वेक्षण केले असून याची आकडेवारी प्रसिद्ध केली आहे आहे. या सर्वेक्षणात प्रदेशनिहाय माहिती देण्यात आली आहे. या सर्व्हेत महायुतीने बाजी मारली आहे. या सर्वेनुसार महायुतीला १४५ ते १६५ तर महाविकास आघाडीला १०६ ते १२६ जागा मिळण्याची शक्यता आहे. राज्यात बहुमताचा आकडा १४५ आहे. म्हणजेच राज्यात महायुतीचे पुढचे सरकार स्थापन होऊ शकते.
पश्चिम महाराष्ट्रात ७० जागांपैकी महायुतीला ३१ ते ३८ जागा मिळतील, तर महाविकास आघाडीला ४० टक्के मतांसह २९ ते ३२ जागा मिळण्याची शक्यता आहे. विदर्भात महायुतीला ६२ पैकी ३२ ते ३७, महाविकास आघाडीला २१ ते २६ जागा मिळण्याची शक्यता आहे. मराठवाड्यातील एकूण ४६ जागांपैकी महायुतीला ४७ टक्के मतांसह १८ ते २४ जागा मिळण्याची शक्यता आहे. शिवाय महाविकास आघाडीला ४४ टक्के मतांसह २० ते २४ जागांवर विजय मिळण्याची शक्यता आहे.