राजकीय

ब्रेकिंग! बार्शीत तगडा राडा

  • बार्शीत माजी आमदार दिलीप सोपल विरुद्ध आमदार राजेंद्र राऊत, हे प्रतिस्पर्धी विधानसभेला पुन्हा आमने-सामने आले आहेत. त्यामुळे बार्शीच्या राजकारणात एका वातावरण तापले आहे. यातच आमदार राजेंद्र राऊत यांचे सुपुत्र रणवीर राऊत आणि कार्यकर्त्यांनी सोपल यांच्या निवास्थानाबाहेर जाऊन गोंधळ घालत दहशत पसरविण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप बार्शी नगरपरिषदेचे माजी गटनेते, नागेश अक्कलकोटे यांनी केला. तर, अ‍ॅक्शनला रिअ‍ॅक्शन होती, असे प्रत्युत्तर राऊत यांनी दिले. माजी मंत्री दिलीप सोपल यांचे बार्शीतील आगळगाव रोडवर असलेल्या निवासस्थानासमोर राजेंद्र राऊत यांचे सुपुत्र रणवीर राऊत आणि कार्यकर्त्यांनी एकच गोंधळ घातला. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
  • व्हिडिओनुसार सोपल यांच्या निवासस्थानासमोर रणवीर राऊत आणि त्यांचे कार्यकर्त्यांनी गाड्या थांबवल्या असून झेंडे फिरवत धिंगाणा घालताना दिसत आहेत. त्यासह रणवीर यांनी सोपल यांच्या घराकडे पाहून दंड आणि मांड्या थोपटत इशारा दिला आहे. यानंतर सोपल यांच्या गटातील नेते, बार्शी नगरपरिषदेचे माजी गटनेते नागेश अक्कलकोटे यांनी राऊत गटावर गंभीर आरोप केले.
  • आमदार राऊत यांचे पुत्र रणवीर राऊत यांनी सोपल यांच्या घरासमोर कोणी नसताना आणि पोलिसांच्या उपस्थितीत विनाकारण गोंधळ घातला. दहशत माजविण्याचा प्रयत्न करण्यात आला. त्यांनी पराभवाच्या भीतीने हे केले आहे. निवडणूक आयोगाने याची दखल घ्यावी, अशी मागणी अक्कलकोटे यांनी केली आहे.

Related Articles

Back to top button