राजकीय
ब्रेकिंग! राज्याचा पुढील मुख्यमंत्री कोण?
- राज्यात उमेदवारांच्या प्रचारासाठी भाजपचे दिग्गज रिंगणात उतरले आहेत. राज्यात प्रचार शिगेला पोहोचला आहे, मतदान तोंडावर आले आहे. धुळे जिल्ह्यात आज पंतप्रधान मोदींची सभा झाली. तर दुसरीकडे सांगली जिल्ह्यातील शिराळामध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची जाहीर सभा पार पडली. या सभेत शहांनी एक विधान केले, ते जास्तच चर्चेत आले. शहांनी देवेंद्र फडणवीसांवर मोठं विधान केले. त्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात चांगलीच रंगलेली आहे.
- सभेत बोलताना शहांनी महाविकास आघाडीवर टीका केली. राज्यात पुन्हा एकदा महायुतीचे सरकार यावे म्हणून त्यांनी मतदारांना मतदान करण्याचे आवाहन केले. त्यांनी आपल्या भाषणात बोलताना फडणवीस यांच्यावरही भाष्य केले. 20 नोव्हेंबर रोजी महाराष्ट्रामध्ये मतदान होणार आहे. त्यामुळे या दिवशी आपल्या सगळ्यांना एक महत्वाची निर्णायक भूमिका घ्यायची आहे. मी संपूर्ण महाराष्ट्रात दोन महिन्यांपूर्वी दौरा केला आहे. फडणवीस यांना पुन्हा आणायचे आहे, अशी महाराष्ट्राच्या जनतेची इच्छा असल्याचे शहा भर सभेत म्हणाले.
- शरद पवारांकडे दहा वर्ष सत्ता असताना त्यांनी महाराष्ट्राला काय दिले? पंतप्रधान मोदींनी मात्र देशाची तिजोरी महाराष्ट्रासाठी खोलली, असा दावा शहा यांनी केला.